फ्रान्सच्या स्पेस युनिव्हर्सिटीकडून सुशांतला श्रद्धांजली

नवी दिल्ली – अभिनेता सुशांत सिंह राजपूत एक उत्तम कलाकार होता. त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. अभिनयाबरोबरच सुशांत सिंह राजपूतला स्पेस सायन्समध्येही रूची होती. तो आपल्या शूटिंगच्या दरम्यान, दुर्बिण आणि सायन्सशी संबंधित वस्तू आपल्या जवळ ठेवायच्या. दरम्यान, सुशांतने आत्महत्या केल्यानंतर फ्रान्सच्या द इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटीने दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. फ्रान्सच्या स्पेस युनिव्हर्सिटीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीने सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर आपले सोशल मीडिया अकाऊंट आणि वेबसाईटवर दु:ख व्यक्त केले आहे. युनिव्हर्सिटीने ट्विटरवर लिहिले आहे, ‘भारतीय कलाकार सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या वृत्ताने आम्ही खूप दु:खी आहोत. तो एक एसटीईएम शिक्षण (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमेटिक्स) चा समर्थक होता आणि सोशल मीडियावर आयएसयूला फॉलो करत होता.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here