पिस्तुल-जिवंत काडतुसासह एकाला अटक; वारजे माळवाडी पोलीस ठाण्याची कारवाई

माळवाडी पोलीस

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी (४ जुलै) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी पुण्यातील वारजे परिसरात छापा टाकला. यादरम्यान पोलिसांनी एका तरुणाकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहेत.

पोलिसांनी तात्काळ त्या तरुणाला अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सागर मुंडे (वय २१) याला अटक केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) येथे आज थोरले बाजीराव पेशवे यांच्या घोडेस्वार पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले. या समारंभाला केंद्रीय गृहमंत्री शाह उपस्थित होते. यावेळी त्यांनी सभेला संबोधितही केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here