बुधवार पेठ परिसरात ८ बांगला देशी महिलांवर कारवाई

बुधवार पेठ
File Photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात छापा टाकून तेथे पश्चिम बंगालच्या रहिवासी असल्याचे सांगून बांगला देशातील ८ महिला स्वखुशीने वेश्या व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले आहे. फरासखाना पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करुन त्यांच्यावर कारवाई केली आहे. गेल्या २ ते ३ वर्षे या महिला येथे विनापरवाना राहत असल्याचे आढळून आले आहे.

पोलिसांनी बुधवार पेठेतून अंजुरा बेगम कामरुल चौधरी (वय ४०), खदीजा बेगम महाबुर शेख (वय २७), पारोल बेगम मिठु शेख (वय ३८), तंजीला बेगम आलमगीर काझी (वय ४०), रुपाली बेगम अकबर शेख (वय ३८), मन्सुरा रफिक हवालदार अख्तर (वय १९), सिमा आलमगीर शेख (वय ४५), रिना खातून फोजर गाजी (वय ३२, सर्व मुळ रा. बांगला देश) या ८ बांगला देशी महिलांना ताब्यात घेतले आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांना गोपनीय बातमीच्या अनुषंगाने तपास पथक तसेच ए टी सी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामधील आशा बिल्डिंग, ढमढेरे गल्ली येथे अवैद्यरित्या बांगला देशी महिला रहात असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याअनुषंगाने शोध घेऊन कारवाई करण्यासाठी फरासखाना पोलिसांनी मोठा फौजफाटा घेऊन दोन पथके तयार केली. या परिसरात २ जुलै रोजी छापे घातले. त्यांना या छाप्यात संशयास्पदरित्या वास्तव्य असलेल्या ८ बांगला देशी महिला मिळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसुन चौकशी केली. त्या गेल्या २ ते ३ वर्षांपासून अवैद्यरित्या भारतात येऊन स्वखुशीने वेश्या व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्या बांगला देशी असल्याचे पुरावे गोळा करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव, उत्तम नामवाडे, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, शितल जाधव, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पुनम पाटील, सहायक फौजदार मेहबुब मोकाशी, खराडे, निढाळकर, शिंदे, पोलीस अंमलदार तेलंगे, नांगरे, पासलकर, शिंदे, महिला अंमलदार साबळे, शिंदे, पाटील, करदास, पुकाळे, कांबळे, गजानन सोनुने, पवार, नितीन जाधव, खुट्टे, जाधव, फिरोज शेख, पालांडे, जुंबड, भालेराव, राऊत, चोरघडे, ढवळे, बनसोडे, जाधव, महाडिक, ओव्हाळ यांनी केली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here