समाजकरण, राजकारण करताना गरीबांचा विचार केल्याने महत्त्व प्राप्त होते – विश्वनाथ कोरडे

विश्वनाथ कोरडे

अहिल्यानगर (जिल्हा प्रतिनिधी दिपक वरखडे) : समाजकारण , राजकारण करताना समाजातील गरीब घटकांचा विचार करावा , जेणेकरून त्याला महत्व प्राप्त होते , आवाहन वजा माहिती भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी केले. पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व माजी सरपंच दिवंगत संदीप वराळ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने निघोज येथे भव्य रक्तदान शिबिराचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला राळेगण थेरपाळ चे सरपंच पंकज कारखिले , सुभाष दुधाडे , भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अतुल माने , पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बाबर , खरेदी विक्री संघाचे संचालक संग्राम पावडे , निघोज च्या सरपंच चित्रा वराळ , उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे , असलम इनामदार , अशोक ढवळे , निलेश घोडे , सुनिल उचाळे , विलास हारदे , अप्पा वराळ , भीमराव लामखडे , बाबाजी लंके , बाबाजी लंके , बजरंग वराळ , मनोहर राऊत , असलम इनामदार , इतर नेते , कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना विश्वनाथ कोरडे पुढे म्हणाले की , दिवंगत संदीप वराळ पाटील हे विकास कामे करताना रात्रीचा दिवस करत असत , त्यांचे कष्ट वाखाणण्याजोगे होते . त्यांनी सुरू केलेले उपक्रम सचिन वराळ पाटलांनी ही सातत्याने सुरू ठेवण्यासाठी त्यांचे सुत्रबद्ध नियोजन आणि कार्यकर्त्यांची खंबीर साथ , यामुळे हे कार्यक्रम यशस्वी होतात .
भाजपाचे पारनेर , सुपा मंडलाचे अध्यक्ष राहूल शिंदे म्हणाले की , संदीप पाटीलांचा विकासाचा संकल्प सचिन पाटलांनी सर्वांना बरोबर घेऊन चालविला आहे . संदीप पाटलांची आठवण आम्हांला सातत्याने येते . त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने भरवलेले हे रक्तदान शिबीर स्तुत्य उपक्रम आहे . त्यांचे कार्य आम्ही भाजपाच्या वतीने पूर्ण करू , असे ही ते म्हणाले तर या कार्यक्रमाचे आयोजक व संदीप पाटील जनसेवा फाऊन्डेशन चे अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी बंधू संदीप वराळ पाटील यांच्या बद्दल आठवणी सांगत त्यांनी गोर गरीबांसाठी दिवाळी भेट व इतर योजनांच्या बद्दल उपस्थितांना माहिती दिली , तर डॉ . पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील फाऊन्डेशन च्या माध्यमातून प्रत्येक वर्षी निघोज मध्ये संदीप पाटील जनसेवा फाऊन्डेशन च्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते , त्याला निघोज ग्रामस्थ भरभरून प्रतिसाद देतात . निघोज जिल्हा परिषद गटात झालेल्या विकास कामांना जिल्ह्याचे पालकमंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा . डॉ . सुजय विखे पाटील यांनी पाठबळ दिल्याने मोठी कामे पूर्ण करता आली , असे गौरवोद्गार ही वराळ पाटील यांनी काढले. सुत्रसंचालन तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे यांनी केले , तर आभार ज्येष्ठ नेते पांडुरंग वराळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here