अहिल्यानगर (जिल्हा प्रतिनिधी दिपक वरखडे) : संदिप पाटील वराळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धर्मरक्षक प्रतिष्ठाण आयोजित रक्तदान शिबीरात युवकांनी घडवला रक्तदानाचा उच्चांक. माजी सरपंच संदिप पाटील वराळ यांच्यावर विशेष प्रेम असणाऱ्या तसेच पै.सुभाष वराळ पाटील यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात २२४ युवकांनी रक्तदान केले तसेच रक्त पिशवी कमी पडल्याने ३५-४० युवकांना रक्तदान करता आले नाही. शिबीरात पै.विलास वराळ पा.,पै.लहू निचीत, हर्षद इधाटे, स्वप्निल आतकर, आप्पाशेठ वराळ तसेच सर्वच सहकाऱ्यांनी घेतलेल्या कष्टाच्या जोरावर अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील युवकांनी रक्तदान केले.
कॅप्टन विठ्ठल वराळ यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करुन रक्तदान शिबीराची सुरुवात करण्यात आली.रक्तदानाच्या निमित्ताने भाजपा कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ दादा कोरडे,शिवसेना अहिल्यानगर दक्षिण जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले,शिवसेना होमिओपॅथिक प्रदेश प्रमुख डाॅ.करण गाडे,शिवसेना नेते बाळासाहेब माळी,शिवसेना केमिस्ट विंगचे पारनेर तालुका अध्यक्ष अक्षय भंडारी,बजरंग दलाचे पदाधिकारी मेजर दत्ता मोटे,राळेगण थेरपाळ गावचे सरपंच पंकज कारखिले,विठ्ठल शेठ कवाद,रोहिदास लामखडे,बबन तनपुरे,अशोक ढवळे,अनिल शेटे,अर्जुन लामखडे, दत्ताभाऊ गुंड,संदिप वराळ,संदिप कवाद,निलेश कवाद,शांताराम कवाद,माऊली वरखडे,टाकळी ढोकेश्वर गावचे उपसरपंच रामा तराळ आणि मित्र परिवार, भास्कर सुपेकर मित्र परिवार,सुभाष गाडीलकर मित्र परिवार,अमोल आल्हाट,अमोल सोनावळे,बेल्हे गावचे युवा नेते मयुर गुंजाळ मित्र परिवार,ॲड.तुषार औटी मित्र परिवार,कैलास कोठावळे मित्र परिवार,पै.जयदिप सालके मित्र परिवार,गणेश बोदगे मित्र परिवार,अमोल भाऊ उगले,राहुल भाऊ औटी मित्र परिवार, पै.संदिप कावरे मित्र परिवार,प्रदिप किठे मित्र परिवार,विकास वरखडे मित्र परिवार,पै.विकी गुंजाळ मित्र परिवार,पै.राहुल गायकवाड मित्र परिवार,मेजर विकास वराळ मित्र परिवार,मेजर दगडू डेरे मित्र परिवार,प्रभू श्रीराम नवमी उत्सव समिती,मा.पप्पूभाऊ राजापुरे मित्र परिवार,ऋतिक पठारे मित्र परिवार, फुटबॉल संघ निघोज,संतोष बोदगे मित्र परिवार,किरण थोरात मित्र परिवार,अमोल गजरे मित्र परिवार,अखिल भारतीय बैलगाडा संघटना पारनेर तालुका मित्र परिवार,बजरंग दल मित्र परिवार,पत्रकार सुरेश खोसे पाटील,संदिप इधाटे,जय हरेल तसेच निघोज व पंचक्रोशीतील सर्वच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान शिबीर घेण्यासाठी ओम ब्लड सेंटर शिरुर यांचे सौजन्य लाभले तसेच जनसंपर्क अधिकारी सोमनाथ सोनवणे सर तसेच राजेंद्र सूर्यनारायण सर यांचे मार्गदर्शन लाभले.







