पोलीस पाटील म्हणजे गावांच्या सुरक्षेचे सेवक आहेत-प्रा.डॉ.जयपाल पाटील

जयपाल पाटील

पनवेल (उपसंपादक गणेश पाटील) : आपल्या गावाकडील शाळा, महाविद्यालय शेजारील पान व चहा टपरीवर मावा,अमली पदार्थ विकत असतील त्याची व समुदकिनारी रिकाम्या बॅगा,अनोळखी,संशईत माणसे दिसत असतील अश्या सुचना ग्रामस्थांनी दिल्यावर पोलीस ठाण्यात त्वरेने कळवावे व सामाजिक बांधिलकी म्हणून महिलांच्या सुरक्षित बाळंतपणात 102 रुग्णवाहिकेचा वापर करावा असे मार्गदर्शन डॉ. जयपाल पाटील यांनी मांडवा पोलीस ठाण्यात पोलीस पाटीलच्या बैठकीत सांगितले.

यावेळी पोलिस ठाण्याचे सहा निरीक्षक श्री.दिपक भोई यांनी डॉ. जयपाल पाटील यांचे व धोकवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहनचालक श्री.मनोजपाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सोबत 16 महिला ,पुरुष यांना पोलीस हवालदार श्री.जयेशपाटील यांनी केले.आपल्या रायगड अधीक्षक यांचे आदेशा नुसार लवकरच मुस्लिम समाजाचा मोहरम आणि हिंदू धर्मियांचे सण येत असल्याने कोणत्याही गावात गडबड होऊ नये यासाठी प्रत्येकासोबत पोलीस हवालदार देऊन दोन्ही सण शांततेत साजरे करावयाचे हे पहावे त्याचबरोबर गावात कोणत्याही आपत्ती येऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन तज्ञ डॉ.जयपाल पाटील हे आपल्या सोबत आले आहेत. ते आपणाला सुरक्षेबाबत मार्गदर्शन करतील त्याचा लाभ तुम्ही घेऊन इतरही ग्रामस्थांना सांगावे.
जयपाल पाटील यावेळी डॉ. जयपाल पाटील यांनी सुरक्षित बाळंतपणासाठी महिलांना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याची 102 रुग्णवाहिकेचा वापर करावयाचा प्रात्यक्षिक देताना धोकावडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉक्टर श्रीमती सुप्रिया वेटकोळी यांना संपर्क साधताच विसाव्या मिनिटाला रुग्णवाहिका पोलीस ठाण्यात हजर झाली.
आपले घर गावात उंचावर असेल तर तेथून रुग्णाला कसे आणावयाचे यासाठी हाताची घडी आणि चादरीमध्ये आणावयाचे प्रात्यक्षिक दाखविले. सध्या पावसाळा जोरात असल्याने विजा चमकतात त्याच्यासाठी सुरक्षित राहण्यासाठी केंद्र सरकारने दामिनी ॲप तयार केला असून त्याचा फायदा आपण व ग्रामस्थांनाही द्यावा, तो आपल्या मोबाईलवर उतरवून घ्यावा,यावेळी , घरातील गॅस वापरा बाबत सुरक्षिततेची माहिती दिली आपण सारेजण पोलीस ठाण्याचे जनसंपर्क अधिकारी आहात, गावात समाज विधायक घटनांची माहिती आपण तातडीने पोलीस ठाण्यात द्यावी, आपत्ती सुरक्षा बाबत तहसील कार्यालयाकडून येणाऱ्या सूचना गावातील विविध मंदिरात लाऊड स्पीकर ची व्यवस्था असते तेथून आरतीच्या अगोदर ग्रामस्थांना कळेल असे वाचून दाखवाव्या म्हणजे आपलं गाव सुरक्षित देश सुरक्षित राहील असे समारोपात सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here