जळगाव (संपादक सुनिल पाटील) : दि. ५ जुलै २०२५ शनिवार रोजी के. सी. ई. सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे के. सी. ई.सोसायटी, जळगावचे सहसचिव ॲड. प्रविणचंद्र जंगले, शिक्षण शास्त्र आणि शारिरिक शिक्षणशास्त्र महाविदयालयाचे प्राचार्य व के. सी. ई.सोसायटी व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा. डॉ. श्री.अशोक राणे, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर तसेच स्कूलचे प्राचार्य श्रीधर सुनकरी आणि उपप्राचार्या श्रीमती रजनी गोजोरेकर यांच्या हस्ते पालखी पूजन करून दिंडी मार्गस्थ करण्यात आली.
इयत्ता नर्सरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांची दिंडी शाळेच्या परिसरात काढण्यात आली.यात इयत्ता तिसरी (गंगा)चा विद्यार्थी पारस अशोक वाघ याने भगवान विठ्ठलाची तर इयत्ता तिसरी (गोदावरी) ची विद्यार्थीनी रियांशी गोकुळ पाटील हिने माता रुक्मिणीची सुंदर व्यक्तिरेखा सादर केली. इतर चिमुकल्यांनी वारकरी वेशभूषा धारण करून भक्तिमय वातावरणाची निर्मिती केली तर इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी एम.जे. कॉलेज परिसर – आस्वाद कॉर्नर – दिवा शोरुम – साई मंदिर – परत आस्वाद कॉर्नर मार्गे शाळेत या मार्गावर निघालेल्या दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
दिंडीत विद्यार्थ्यांनी विठू नामाचा गजर करत, कीर्तन, भजन, पावली, भारुडे,फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. दिंडी मार्गात गुलमोहोर कॉलनी तसेच परिसरातील साई मंदिर भक्त परिवारातर्फे पालखीचे पूजन करण्यात आले. दिंडी परत शाळेत आल्यावर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार असा रिंगण सोहळा सादर करत पंढरीच्या वारीचे अनोखे दर्शन घडवले. दिंडी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तर सिद्धेश्वर पाटील यांनी सुत्रसांचालन केले.







