पंढरपूर तालुक्यातील सोनके येथील श्रीनाथ विद्यालयात आषाढीनिमित्त वारकरी दिंडी

श्रीनाथ विद्यालयात

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : शुक्रवार (दि.४) विद्यालयात आषाढी वारीनिमित्त विद्यार्थी वारकरी दिंडी सोहळा संपन्न झाला. विद्यालयातील संगणक शिक्षक ह.भ.प श्री सावंत सर यांनी आपल्या प्रवचनातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. या दिंडी सोहळ्यामध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन विठुरायाचा नाम जयघोष केला.

त्यानंतर टाळ मृदुंगाच्या जयघोषात, गजरात विद्यालयाच्या प्रांगणामध्ये रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी फुगडी खेळून व विठुरायाचा नाम गजर करत रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री महेश इंगोले सर, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, वारकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here