सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | ग्रामपंचायत शिरसी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे लोकसहभागातून आयोजित ‘जलतारा व वृक्ष लागवड मोहिमे’चा १८ ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत उत्साहात शुभारंभ करण्यात आला. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कुशल जैन आणि मंगळवेढ्याच्या गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबवण्यात आली.
पंचायत समिती मंगळवेढ्याच्या सभापती मा. सौ. दिपालीताई ताड, जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. करुणा शिवशरण आणि पंचायत समिती सदस्य मा. विनायकराव यादव यांच्या शुभहस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून जलसंधारणाची विविध कामे आणि वृक्षारोपण करण्यात आले. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढवणे, विहिरी व बोअरवेलची पाणीक्षमता वाढवणे आणि शेतीसाठी पाण्याचा शाश्वत पुरवठा उपलब्ध करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमप्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख म्हणाल्या, “जलसंधारणामुळे मातीची धूप थांबते आणि दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईवर मात करणे सोपे जाते. भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी प्रत्येक गावाने अशा लोकचळवळीत सक्रिय सहभागी झाले पाहिजे.” सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी शिरसी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले:
प्रमुख उपस्थिती व संयोजन: सरपंच बाबासाहेब कसबे, उपसरपंच शहाजी अवताडे, माजी सरपंच बाबासाहेब गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी सौ. राखी जाधव, तंटामुक्त अध्यक्ष सुखदेव गायकवाड, अध्यक्ष बाबासो बाबर, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर गायकवाड, प्रकाश घोडके आणि पोलीस पाटील तानाजी गायकवाड.
प्रकीय व तांत्रिक सहभाग: प्रशासकीय अधिकारी शुभम शिंदे तोरणे, नोडल अधिकारी आर. पी. कांबळे, श्रीमती ए. व्ही. आडतराव, प्रशांत ढगे, मोटे, बापूराव बाबर, कृषी सहाय्यक दीपक कोकरे, उपाध्यक्ष युवराज कोळी, दादा ताड, दत्तात्रय वाघमारे, अक्षय गायकवाड, गणेश आवताडे आणि दत्ता गायकवाड.
या मोहिमेत वेताळ विद्यामंदिर व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक-विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसहभागातून जल व पर्यावरण संरक्षण हीच काळाची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.







