पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) | पंढरपुर शहरामध्ये वारी कालावधीत दर्शना करीता आलेल्या भाविकांचे गर्दीमध्ये हरवलेले तसेच चोरीस गेलेले १०,३५,०००/- रू किंमतीचे मोबाईल जप्त करून ते पुन्हा भाविकांना देण्यात आले.
पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीत श्री विठ्ठलाचे दर्शनाकरीता आलेल्या भाविकांचे गर्दीमध्ये मोबाईल पडुन गहाळ झालेले तसेच चोरीस एकुण १०,३५,०००/- रू किंमतीचे गेलेले ४६ मोबाईल याचा CEIR पोर्टलद्वारा तसेच गोपनिय बातमीदारा मार्फत शोध घेवुन ते ट्रेस करण्यात आले आहेत. सदरचे मोबाईल हे मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय कबाडे, मा.श्री. प्रशांत डगळे, सहा. पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपुर विभाग, पंढरपुर यांचे सुचनेनुसार व पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली “गुन्हे प्रकटीकरण” शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय कबाडे, मा. सहा. पोलीस अधिक्षक, श्री प्रशांत डगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपुर विभाग, पंढरपुर तसेच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री महेश ढवाण, पंढरपुर शहर पोलीस ठाणे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री नितीन जगताप, सपोफौ सुजित उबाळे, पोहेकॉ /२७४ बनसोडे, पोहेका / १५८३ मोरे, पोहेका / ८०५ पवार, पोहेका /१७८९ हेंबाडे, पोहेका / १४१३ काझी, पोका / ३१ माने, पोका / १२१६ मंडले, पोकॉ /१२४० ठाकर व CEIR पोर्टलचे काम पाहणारे पोहेका २२१ प्रसाद औटी तसेच सायबर पोलीस ठाणे कडील पोका गोविंद सोनवणे यांनी केली आहे.







