सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : दक्षिण सोलापूर येथील फताटेवाडी गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोरच ठेवून संतप्त नागरिकांनी आंदोलन केलं.
फटाटे वाडी गावातील रहिवासी मिथुन धनु राठोड प्रकल्पग्रस्त शेतकरी असून तो वेळोवेळी मध्ये रोजगार मिळण्याबाबत अर्ज करून सुद्धा रोजगार मिळाला नाही व तसेच वाढीव मोबदला मागील बारा वर्षांपासून प्रलंबित असून त्यांना रोजगार न मिळाल्यामुळे दैनंदिन गरजा अपूर्ण राहिल्या तरी व दिवसेंदिवस कर्जबाजारी होत राहिले तरी वेळोवेळी एनटीपीसीला रोजगार मागितला तरी त्यांची बाजू ऐकून घेतली नाही म्हणून फताटेवाडी गावचा एक शेतकरी मिथुन धनु राठोड (वय वर्ष ४५) शेतकऱ्याचे नाव आहे सोलापूर जिल्ह्यातील फताटेवाडी येथे एनटीपीसी प्रकल्प स्थापित झाल्यानंतर अनेकाच्या जमिनी अधिकृत करण्यात आल्या होत्या.
या अधिकृतचे वाढीव पैसे मिळण्याबाबत तसेच प्रकल्पग्रस्त म्हणून एनटीपीसी मध्ये नोकरी मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून त्याचे प्रयत्न सुरू होते मात्र त्या त्यांना यश आले नाही यामुळे ते त्रस्त होते त्यातूनच त्याने आपल्या शेतात आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकाने एनटीपीसी प्रकल्पासमोरच आंदोलन सुरू केले मिथुन राठोड यांचा मृतदेह प्रवेशद्वारासमोरच ठेवून आंदोलन करण्यात आले.







