उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन; मंदिर संवर्धन विकास कामांची केली पाहणी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) | राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा शाल आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

 

या सोहळ्याप्रसंगी आमदार दिलीप वळसे पाटील, नगराध्यक्षा प्रणिती भालके, मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व संभाजी शिंदे उपस्थित होते. तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दर्शन घेण्यापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्या’ अंतर्गत मंदिरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामांचा आढावा घेतला. या वेळी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आराखड्यांतर्गत आतापर्यंत पूर्ण झालेली कामे आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या नियोजित कामांची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार पूर्ण झाला आहे, त्या मंदिरांमधील मूर्तींची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मंदिरात विशेष होम-हवनचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी या चालू असलेल्या होम-हवन विधीचे देखील दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले.उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here