पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपुरातील सफाई कर्मचारी यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याकरिता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याची सांगितले त्याचबरोबर पंढरपूर शहरात आषाढी एकादशीनंतर पंढरपूर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. त्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्याबद्दल त्यांच्या कामाचे कौतुक देखील यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांच्याकडून पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचारी ,कामगार , वर्ग यांना कौतुकाची थाप मिळाल्यानंतर पंढरपुरातील सर्वच सफाई कर्मचारी पुन्हा जोमाने कामाला लागले असून पंढरपूर शहरात स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात केली जात आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचे केली जाणारे कौतुक आणि सफाई कर्मचारी यांच्यासोबत अगदी चटईवर बसून चर्चा करणारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे इतिहासातील पहिले जिल्हाधिकारी आहेत..
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विविध ठिकाणांना भेट देऊन कर्मचाऱ्यांसोबत चर्चाही केली आहे. व त्यांच्या कार्याचे कौतुक करत सफाई कर्मचाऱ्यांना शाबासकी दिली आहे .. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून आपल्या कार्याची प्रशंसा आणि कौतुक झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे … वरिष्ठांनी केलेली प्रसंशा व कार्याचे कौतुक यामुळे हे कर्मचारी सातत्याने स्वच्छता मोहीम राबवत आहेत… त्यामुळे सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे जिल्हाधिकारी आता कामगारांना देखील आपलेसे वाटू लागले आहेत.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, कामगार वर्ग , विविध सामाजिक संस्था, यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी एकादशी यात्रा २०२५ ही यशस्वीरित्या पार पडली आहे. जिल्हाधिकारी यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.







