करमाळा पोलिसांनी सोने चोरीतील आरोपीस केले जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

करमाळा

सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : १५ फेब्रुवारी २०२५ ला दुपारी ३ वाजेच्या सुमारास टाकळी चौक येथून दोन किलोमीटर अंतरावर महिलेच्या हातातून पडलेली पर्स उचलून देण्याच्या बहाण्याने पर्समधील १ लाख ६० हजाराचे सोने चोरून नेले होते. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं.११८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे फिर्याद दाखल झाली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आशा सोपान रणसिंग (वय ४८, रा.खातगाव, ता.करमाळा, जि.सोलापूर) या आपल्या नोकरीचे ठिकाण प्राथमिक आरोग्य केंद्र राशीन, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर येथून जात असतांना त्यांची पर्स खाली पडली. यावेळी मोटारसायकल क्रमांक एम.एच.४२, बी.एम.६५१० वरील अज्ञात व्यक्ती फोनवर बोलत असतांना, त्याने फिर्यादीची पर्स उचलून देण्याच्या बहाण्याने त्यांच्या पर्समधील १ लाख ६० हजार किंमतीचे अंदाजे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे चैन, गळ्यातील गंठण त्यांच्या संमतीविना चोरून नेले.
फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तात्काळ पथक तयार करुन त्यांना मोटारसायकलची माहिती घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना योग्य त्या सूचना दिल्या. सदर गाडी मालकाची माहीती काढली. तसेच घटनेच्या वेळी सदर मोटारसायकल कोणाच्या ताब्यात होती याबाबत अधिक तपास केला असता सदर मोटारसायकल ही घटनेच्या वेळी इसम नामे झिंगडया उर्फ हरी पानफुल्या भोसले, रा. टाकळी, ता. करमाळा याच्या ताब्यात होती अशी माहीती मिळाली, तसेच सदरची घटना घडल्यापासून सदर इसम हा फरार असले बाबत माहीती मिळाली.
सदर माहीतीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी दोन पथके तयार करुन सदर संशयीत आरोपीची माहीती काढण्यासाठी योग्य त्या सुचना देवून रवाना केले. सदर तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना संशयीत आरोपी नामे झिंगडया उर्फ हरी पानफुल्या भोसले, रा. टाकळी, ता. करमाळा हा इंदापूर, दौंड, भिगवण, श्रीगोंदा पोलीस ठाणे हददीमध्ये वारंवार वास्तव्य बदलून राहत असल्याची माहीती मिळाली.
त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की सदर आरोपी भिगवण, जि. पुणे येथे आला आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना तात्काळ रवाना करुन वरील आरोपीस ताब्यात घेतले. त्याचे कडे सदर गुन्हयाबाबत सखोल तपास केला असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली परंतू त्यास अधिक विश्वासात घेवून सखोल तपास केला असता त्याने सदर गुन्याची कबूली दिली तसेच सदर गुन्हयातील चोरी केलेला मुददेमाल गुन्हयातील चोरीस गेलेले १,६०,०००/- रु किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच ४०,०००/- रू किंमतीची गुन्हयात वापरलेली मोटारसायकल असा सुमारे २,००,०००/- रू किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ / ३५० शेख हे करत आहेत. सदर आरोपीवर यापुर्वी दौंड रेल्वे पोलीस ठाणे गुर नं. १४ / २०११ भादवी कलम ३९५, दौंड रेल्वे पोलीस ठाणे गुर नं. १३/२०१४ भादवी कलम ३९५ सह आर्म अॅक्ट ४, २५ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी ही अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक डॉ. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, पोहेकॉ / १६४८ अजित उबाळे, पोना / ११६२ मनिष पवार, पोना / ९१२ वैभव ठेंगल, पोकॉ / १५२४ अमोल रंदिल, पोकॉ/ ६८९ योगेश येवले, पोकॉ/ ९६१ गणेश खोटे, पोकॉ/ २५ समाधान भराटे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकॉ / २२२ व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here