वर्ल्ड विजन इंडिया या संस्थेचे डायरेक्टर ऑपरेशन डॉ. अनिल खांडेकर यांची गावांना भेट व मार्गदर्शन

वर्ल्ड विजन इंडिया

जळगाव (जिल्हा क्राईम रिपोर्टर विनोद पाटील) : धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटक तील गरजू विद्यार्थी मुलांसाठी वर्ल्ड व्हिजन सेवाभावी संस्था गेल्या सहा वर्षापासून मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी कार्य करत आहे ग्रामीण भागातील मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी काम करत आहे 22 गावातील दोन हजार चाळीस मुलांच्यासाठी शालेय साहित्य सह त्यांच्या पालकांना रोजगार आणि आरोग्यासाठी संस्था साहित्य पुरवित असते मुलांचा सर्वांगीण विकासत कशा पद्धतीने सुधारणा झाल्या याची पाहणीसाठी संस्थेचे व्यवस्थापक माननीय डॉ.अनिल खांडेकर साहेब निशाने गावापासून सुरुवात केली व फूलपात, टहकाली, वराड बुदरुख त्यांनी मुलांना वर्ल्ड व्हीजन संस्थेचे विज़न व ब्रीदवाक्य म्हणून सांगितले.

” प्रत्येक बालकाचे ,परिपूर्ण जीवन हेच, आमचे स्वप्न प्रत्येक ,हृदयी हा संकल्प ,ही आमची प्रार्थना” हे ब्रीदवाक्य मुलांना समजावून व हसत व बालका मध्ये सहाभागी होऊन खेळत वातावरणात त्यांनी मुलांची चर्चा केली मुलांचा सर्वांगीण विकास कसा झाला पाहिजे, मुलांचे अधिकार याबद्दल त्यांनी माहिती सांगितली मुलांच्या पालकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या यावेळी त्यांच्या सोबत प्रकल्प अधिकारी मा.जितेंद्र गोरे यांनी झालेल्या मदत कार्याचा अहवाल व्यवस्थाप मा. डॉ.अनिल खांडेकर साहेब यांच्याकडे सादर केला
अतिशय ग्रामीण भागात येऊन वर्ल्ड विजन इंडिया या संस्थेचे व्यवस्थापक डॉ. खांडेकर साहेब, जितेंद्र गोरे साहेब यांनी केलेल्या मदत कार्याबद्दल ग्रामस्थांनी लाभार्थी विद्यार्थी पालकांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी सहकार्य सरपंच मंगला पाटील, उपसरपंच, शशिकांत बोरसे, माजी सरपंच काशिनाथ पाटील,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मॅडम दिपाली वानखेडे, पवार सर, बाल संरक्षण समिती अध्यक्ष निशा बोरसे, ज्योती पाटील अंगणवाडी मदनिस सर्व उपस्थिति होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here