सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : कोकराळे,ता.खटाव येथे मोहरम हा सण परंपरे नुसार साजरा करण्यासाठी कोकराळे येथील मुस्लिम हिंदू समाजातील बांधव आपले भेदभाव विसरून सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन मोहरम साजरा करतात. खातगुण येथील मुस्लिम बांधव पंजे घेऊन कोकराळ येथे भेटीला येतात.मुस्लिम /हिंदू बांधव डोले ,पंजे काढतात कोकराळे गावातील जे कामानिमित्ताने बाहेर गेलेले असतात ते या सणाला आपल्या गावी येतात.
तसेच या गावातील मुली विवाह होऊन गेलेल्या आहेत त्यापण हा मोहरम साजरा करण्यासाठी येतात.मिठाईची ,जिलेबी, पेढे,खेळण्याची,दुकाने लागली आहेत. कोकराळे ग्रामस्थ मोहरम साजरा करतात, तसेच देवाचे सेवक गणीभाई मुलानी हे तिथले व्यवस्था पाहतात.







