जळगाव (जिल्हा क्राईम रिपोर्टर विनोद पाटील) : धरणगाव तालुक्यातील स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना रेशन दुकानात ई केवायसी ची प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे यासाठी तालुका पुरवठा विभाग द्वारे वेळोवेळी मुदत वाढ देण्यात आली आहे असे असले तरी सध्या स्थितीत तालुक्यात काहि लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केली नसल्याने या लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित रहावे लागणार आहे
तालुक्यातील रेशन दुकानात असलेल्या ई. पॉस मशीनवर ही प्रक्रिया केली जाते सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये मयत झालेल्या परंतु नाव कमी न केलेल्या , लग्न होवून बाहेर गावी गेलेल्या मुली किंवा कायम स्वरूपात स्थलांतर केलेल्या व्यक्ती ह्या अपात्र असलेल्या काही नागरिकांद्वारे रेशन धान्याचा लाभ घेतला जात असल्याने शासनाच्या निदर्शनात आल्यानंतर यामध्ये लाभार्थ्यांची ई.केवायसी करण्याचे निदर्श शासनाद्वारे देण्यात आले
मागील वर्षभरापासून तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये ही प्रक्रिया केली जात आहे शासनाच्या स्वस्त धान्याच्या लाभ अपात्र व्यक्तींना मिळू नये यासाठी ई.केवायसी ची प्रक्रिया केली जात आहे वारंवार सूचना दिल्यानंतरही ई केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द होणार आहे अशी माहिती धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी दिली







