पारोळा (तालुका क्राईम रिपोर्टर समाधान धनगर) : सोमवारी (दि.१४) पिंपरी प्र. उ. व टोळी शिवारामध्ये दोन वेगवेगळ्या गावठी दारूच्या हातभट्टींवर छापा पोलिसांनी छापा टाकला.
यावेळी गावठी हातभट्टी दारू व हातभट्टी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन असा एकूण एकूण १ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये आबा पोपट भिल (वय ५४ वर्ष, रा. पिंप्री प्र. उ., ता. पारोळा), अलकाबाई भगवान बोरसे (वय ४६ वर्ष, रा. पिंप्री प्र. उ., ता. पारोळा) या आरोपीतांवर मुंबई दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.







