मराठा सेवा संघ शहराध्यक्षपदी प्रतिक मराठे तर सचिवपदी सतिश माने यांची बिनविरोध निवड

मराठा सेवा संघ

पारोळा (तालुका क्राईम रिपोर्टर समाधान धनगर) : जळगाव जिल्हा मराठा सेवा संघाच्या आदेशान्वये पारोळा शहर मराठा सेवा संघ कार्यकारिणीची निवड डॉ.शांताराम पाटील अध्यक्ष मराठा सेवा संघ पारोळा तालुका यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

त्यात शहराध्यक्षपदी प्रतिक मराठे ,सचिवपदी सतिश माने, उपाध्यक्षपदी प्रभाकर पाटील , कार्याध्यक्षपदी संदिप बळीराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली . सदर प्रसंगी पारोळा तालुका मराठा सेवा संघ सचिव प्रा.जे.बी.पाटील, रवि पाटील, डॉ.योगेंद्र पवार, देविदास सोनवणे,निलेश पाटील ,मनोहर पाटील व समाज बांधव उपस्थित होते.सदर नवनिर्वाचित कार्यकारिणीने मराठा सेवा संघाच्या निर्देशानुसार विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करावे व कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न करावेत.
सदर प्रसंगी मराठा सेवा संघाचे पारोळा तालुका उपाध्यक्ष रवि पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रवक्ता अकॅडमीची स्थापना केली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.सर्व नवीन पदाधिकारींचे जळगाव जिल्हा व पारोळा तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here