सावकर सद नाईक राजकीय वळचणीला का गेले?

राजकीय

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) : साधारण पणे ८० च्या दशकात शेतकऱ्यांच्या घराघरात पोहोचलेले , खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हृदयातील ताईत झालेले कै,शरद जोशी यांच्या नंतर काही काळ पक्ष्चिम महाराष्ट्रात उस उत्पादक शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत झालेले खा राजु शेट्टी यांनी अनेक वेळा लाट्या काट्या खाऊन वेळ प्रसंगी साखर कारखान्याच्या हल्यात जिव धोक्यात घालून उस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या २०/२२ वर्षा पासून लढा देत आहेत, अजुनही तो थांबलेला नाही, उस आंदोलना बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात कांदा, कापूस, सोयाबीन, दुधाचे ही आंदोलने करून उत्तपादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही,

कधी नव्हे ते एकत्र आलेल्या शेतकऱ्यांच्या एकजूटीवर राजकीय नेत्यांनी अनेक प्रलोभने व आमिषे दाखवत फुट पाडव्याच्या प्रयत्न सातत्याने केला आहे, राजकीय महत्वाकांक्षेला उभारी देऊन राजकीय पक्षांत ओढून सत्तेचे गाजर दाखवून चळवळ मोडीत काढण्याचा प्रकार मागिल ४० वर्षात अनेक वेळा घडत आहे, संघटनेच्या फूटीचा अध्याय लिहिला गेला आदी ऊस ह्या पिकाच्या बिघडलेल्या अर्थशास्त्राचे गणित कारखानदारांच्या डोळ्यात डोळे घालून मांडण्याचे धाडस ज्या संघटनेच्या माध्यमातून राजू शेट्टी व त्यांच्या असंख्य शिलेदार व कार्यकर्त्यांच्या द्वारे ऊस पट्ट्यात केल गेल त्यात प्रामुख्याने अनिल उर्फ सावकर सदनाईक यांचे घ्यावं लागेल, त्यांनी केलेल्या संघर्षाला तोड नाही.एकेकाळी उसाच्या फडातील उसाची पाने देखील स्वाभिमानी संघटनेच्या ओळखत असतील.त्याच कारखान अशी आंदोलनाची धग निर्माण कारखान् दारांनी झोप उडवून देनारे सदनाईक अखेर राजकिय वळचणीला गेले,राजु शेट्टी नेहमी म्हणत चळवळींचा चेहरा जरी मी असलो तरी माझा पाटिचा कणा सावकर आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी लढत आहे, या लढाई मध्ये प्रशासनाला व कारखानदारांना अंगावर घेऊन चळवळीची ढाल बनून शेकडो गुन्हे अंगावर घेऊन लढणारे सदनाईक स्वाभिमानीच्या चळवळीतून बाहेर पडले, शेतकरी संघटनेच्या सुरुवातीपासूनच संघटनेची छकले पाडण्याचा प्रचंड उद्योग केला गेला,पण बहाद्दर शेतकऱ्यांच्या तरूण तरण्या बांड पोरांनी अनेक केसेस, लाट्या काट्या अंगावर घेऊन चळवळ जोमाने सुरू ठेवली आहे,*अखेर शेतकऱ्यांनाच उत्तपादकांच्या अंगावर सोडून त्यांच ऊसाचा मळा लुटण्याची प्रतिज्ञा आज पूर्ण केली.
जगातील सर्वात मोठ्या वांझोट्या पक्षाला दुसऱ्यांची पोर कडेवर बसवून घ्यायची हौस आहे लाखो शेतकर्यांनी गेल्या अनेक वर्षांत शेतकरी नेता म्हणून अनेकांना मिळवून दिलेली श्रीमंती इतक्या स्वस्तात सत्ताधाऱ्यांच्या दावनिला बांधली याच आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही,शेतकरी नेत्यांनी अखेर *कारखानदारांच्या पायाशी डोकं ठेवत आपण नावाने सावकर व मनाने किती गरीब (दुबळे) आहोत हे दाखवून दिले..स्वार्थासाठी म्हणा किंवा मजबुतीने प्रवाहाबरोबर जावंच लागत म्हणत शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव हा एककलमी कार्यक्रम धाब्यावर बसवत अनेक भाऊ,दादा, बापू,आणा्, तुपकर,टिक्कर,प्राध्यापक,इंजि,सरांच्यानंतर आण्णांच्या फाटाफूटीच स्वाभिमानी ने वर्तूळ पूर्ण केले.
किती दिवस आम्ही लढायच! म्हणत म्हणत आपल्याला विस्थापित म्हणून न राहता चळवळीच्या नावावरील प्रस्थापित होण्याचा लोभ थांबवता येत नसल्याच दाखवले..आपल्या सर्वांच चळवळीत मोठं योगदान जरी असले तरी आपण अशा पद्धतीने शेतकरी चळवळीचा घात करणे गैरच आहे, लोभापायी ईमान(स्वाभिमान) विकलेली काही बाजारु ठेकेदार बरोबर घेऊन प्रवेशासाठी गेली अनेक वर्षे हाताची मूठ आवळून शेतकरी बापाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केलेल्या शेतकऱ्यांकडुन शुभेच्छा.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here