देवळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सार्थक नेहते यांच्या दोन वर्षांच्या उल्लेखनीय कार्यकाळात जनतेला आधार

देवळा पोलीस

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) | देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी मागील दोन वर्षांच्या यशस्वी कार्यकाळात आपल्या कर्तव्यदक्षतेने आणि लोकभिमुख कार्यशैलीने देवळा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच सर्वसामान्य जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते.

 

अतिशय प्रेमळ, मनमिळाऊ आणि तितकेच कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन, त्यांच्या मनातील भावना ओळखून त्यांना धीर व आधार देण्याची त्यांची हातोटी विलक्षण आणि वाखाणण्याजोगी होती. संकटकाळात नागरिकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सदैव तत्परता दाखवली, ज्यामुळे पोलीस आणि जनता यांच्यातील नाते अधिक घट्ट होण्यास मदत झाली.

जनतेच्या मनातील हक्काचे अधिकारी ठरलेल्या आदरणीय सार्थक नेहते यांना त्यांच्या पुढील यशस्वी सेवा आणि भावी वाटचालीस समस्त नागरिकांच्या व बुलंद पोलीस टाइम्सच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here