पारोळा (तालुका क्राईम रिपोर्टर समाधान धनगर) : शहरातील नगर परिषद परिसरात ‘शिव प्रोविजन’ येथून काही दिवसापूर्वी रात्रीचे सुमारास टाटा नमक कंपनीच्या मिठाचे पोत्यांची चोरी गेल्याचा प्रकार घडला होता. दिनांक 12/07 /25 रोजी शिव प्रोविजन दुकानाचे मालक शंकर बागनमल सिंधी, वय 64 वर्ष, राहणार बहिरम गल्ली, पारोळा यांनी पोस्टेला सदर चोरीबाबत फिर्याद दिली होती.
सदर दाखल गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल संजय पवार व पोलिस अमलदार अजय बाविस्कर हे करत असताना, दिनांक 4 /7 /25 व 5/ 7 /25 रोजीचे रात्री उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित इसमांचा सोशल मीडियाद्वारे प्रसार करून ,गोपनीय बातमीदाराने दिलेल्या खबरीवरून इसम नामे 1)राजू पंडित बच्छाव व 2)रमेश जाधव उगरेच्छा ,दोघे राहणार श्रद्धा नगर, गलवाडे रोड, अंमळनेर यांचेकडे चोरीचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता, गुन्ह्यातील चोरी गेलेले मिठाचे पोते त्यांनीच चोरी केल्याचे कबूल केले. त्यावरून संबंधितांना तात्काळ ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई अंति अटक करण्यात आली.
न्यायालयाने त्यांना 02 दिवस पीसीआर मंजूर केला. तपासा दरम्यान नमूद आरोपींनी गुन्ह्यातील गेला मुद्देमाल टाटा नमक कंपनीचे एकूण 12 पोते किंमत रुपये 16800/- असा पंचा समक्ष काढून दिला तो जप्त करून मा. न्यायालयाचे आदेशाने यातील फिर्यादी यांना सुपूर्द करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव, अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ, डीवायएसपी अमळनेर भाग व पोलीस निरीक्षक पारोळा यांचे मार्गदर्शना खाली HC/संजय पवार HC/शरद पाटील ,HC/महेश पाटील व पोलीस अमलदार अजय बाविस्कर यांनी पार पाडली. सदर कारवाईबद्दल व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.







