पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने भव्य वाद्यपूजन व सराव शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा ग्राउंड झीरो, दत्तवाडी कमानी शेजारी उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करून संपन्न झाला.
यावेळी पुनित दादा जोशी (सरचिटणीस, पुणे भाजपा) व पराग ठाकूर (अध्यक्ष,ढोल ताशा महासंघ) सामाजिक कार्यकर्ते अमोल शुक्ला व भरत अमदापुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास पुणे शहरातील विविध पथकांतील पदाधिकारी, वादक, तसेच गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाद्यपूजनासोबतच नवीन सराव सत्राचा प्रारंभही करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन अमर लक्ष्मण भालेराव (तात्या) – (संस्थापक, अध्यक्ष रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट व अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट, पुणे ) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे हे गेली 9 वर्षांपसून गणेशोत्सव, पालख्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपला ठसा उमटवत आहे. यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी या पूजन सोहळ्याने अधिकच जोमाने सुरू झाली आहे. वाद्यपूजन व सराव शुभारंभ सोहळ्यातील रंगीत वेशभूषा, पारंपरिक ढोल-ताशा वादनाचा नाद, आणि विविध सांस्कृतिक घटकांचे दर्शन याने उपस्थितांची मने जिंकली.







