सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : माळशिरस येथे जाधव हॉटेलमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांशी संघटनात्मक विषयावर संवाद साधला व भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत योग्य न्याय देवून, जुन्या-नव्यांना सोबत घेवून, एकजुटीने भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
या मेळाव्यात माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय पाणीदार माजी खा. रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर, फलटण विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन पाटील,माजी आ. रामभाऊ सातपुते, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रमुख उपस्थिती हा मेळावा पार पडला.
यावेळी सचिन शिंदे, आप्पासाहेब देशमुख, बाळासाहेब सरगर, शरद मदने, राहुल पदमन, शशि कल्याणी, सोपानकाका नारनवर, हनुमंत सुळ, बाजीराव काटकर, माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन मोहिते, नातेपुते मंडल अध्यक्ष संजय देशमुख, अकलूज मंडल अध्यक्ष सुजयसिंह माने-पाटील, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे यांच्यासह भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा मोर्चा सेल आघाडी पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख,बूथ प्रमुख, अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







