जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) : अमळनेर तालुक्यातील जळोद या गावातून गांजा घेऊन अमळनेरला विक्री करण्यासाठी येणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अंमळनेर पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की दोन जण मोटरसायकलवर गांजा घेऊन अमळनेर शहरात येणार आहे. याबाबतची सूचना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना दिल्यानंतर सदर छापा टाकण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगी घेऊन अमळनेर तालुक्यातील जळोद गावात एका शेतात जवळ थांबले. मोटर सायकल क्रं. एम. एच. १९-सी. टी. ४८४५ रात्री 10.10वाजेच्या सुमारास जळोद गावाकडुन एक काळ्या रंगाची बजाज प्लॅटीना मोटर सायकलवर दोन इसम हे डबलशीट आले .पोलिस कर्मचारी अमोल पाटील व जितेंद्र निकुंभ यांनी थांबविले असता त्याच्या ताब्यातील एक पांढ-या रंगाची गोणीसह दोघाना ताब्यात घेतले.पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम तहसिलदार रुपेशकुमार सुराणा अमळनेर सोबतच्या पोलीस स्टाफ व पंच पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. मोटर सायकल चालक महेश कैलास पाटील वय ३१ वर्ष धंदा मजुरी रा. मेन रोड, जडे गल्ली, भडगाव ता. भडगाव व त्याचे सोबत नितीन शरद गौड (मसराम) वय १९ वर्षे धंदा मजुर रा. गौंडबस्ती देशमुखनगर, पाचोरा असे सांगितले. दोघाना ताब्यात घेऊन गांजा व मोटर सायकल जप्त करण्यात आला.







