वडाळी येथे कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवशी तब्बल 18 लोकांचे रिपोर्ट पाँझिटीव्ह

शहादा (तालुका प्रतिनिधी विजय निकम) – तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे असलेल्या वडाळी येथे दोन रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यानंतर एक रुग्ण एक रुग्ण बरा होऊन आपल्या घरी परतला असून एकाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोघा रुग्णांच्या त्यांच्या संपर्कातील 18 व्यक्तींना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्याने गावाचा परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्रशासनाने गाव हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे
प्रशासनाकडून उपाययोजना युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल्या असून गावात विविध विभागाचे अधिकारी दाखल झाले बैठक घेऊन विविध चर्चेअंती संपर्कातील लोकांची शोधाशोध सुरू आहे ग्रामपंचायत प्रशासनामार्फत निर्जंतुकीकरण करण्यात आले व पुढील चार दिवस गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे
वडाळी तालुका शहादा येथील गेल्या आठवड्यात दोन लोकांचां पॉझिटिव रिपोर्ट आल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी प्रशासनाकडून 18 लोक पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट काल सायंकाळी झाल्यानंतर आज वडाळी येथे ग्रामपंचायत कार्यालयात गटविकास अधिकारी सी टी गोसावी पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे सरपंच हिम्मत सोनवणे पोलीस पाटील गजेंद्र गोसावी माजी पंचायत समितीचे सदस्य गिरीश जगताप आबा सोनवणे माजी सरपंच दीपक पाटील राजेंद्र सोनवणे तुषार गोसावी आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थांची बैठक होऊन संपूर्ण गाव निर्जतुकीकरण करण्यात आले तसेच बाधित क्षेत्र असलेल्या परिसर बेरी कटिंग करण्यात आले वडाळी आधीच गेला असला तरी ग्रामीण भागात एकाच वेळी 18 कोरोना पॉझिटिव निघाले असून त्यांना शहादा येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी पाठवण्यात आले तर वडाळी हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले तसेच गावातील बाजारपेठ ही चार दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे सर्दी खोकला तापाची लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी व संपर्कातील व्यक्तींना ही स्वतः पुढे येऊन स्वेब द्यावे तसेच ग्रामस्थांनी तोंडाला माक्स बांधा एकाच ठिकाणी गर्दी करु नये सोशल डिस्टंसिंग ठेवा साखळी तोडण्यात प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान गटविकास अधिकारी सिटी गोसावी यांनी बैठकीत केली
आरोग्य प्रशासनास युद्धपातळीवर सर्वेक्षण
आरोग्य विभागाकडून सहा वेगवेगळी पथके तयार करुन 14 दिवसापर्यंत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे स्कॅनिंग मशीन द्वारे तपासणी करण्यात येत आहे तसेच मागविणार गावात कोणी फिरू नका प्रशासनाची नियमांचे पालन कराव आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहान प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र दुगड यांनी तर ग्रामपंचायत प्रशासनातर्फे ग्राम विकास अधिकारी बी बी देसले महसूल विभागातर्फे एस एस साळवे तलाठी महेश ठाकरे यांनी केले आहे
वडाळी आरोग्य केंद्रातच घेतले स्वाब
उपविभागीय अधिकारी डॉ चेतन गिरासे तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार वडाळी तालुका शहादा येथे आरोग्य विभागाकडून स्पेशल पथक पाठवून 27 लोकांचे स्वाप घेण्यात आले असून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात असल्याची माहिती प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी एम पाटील यांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here