चाळीसगाव नागद रोड येथे शहीद अब्दुल हमीद यांचा पुतळा उभारण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

शहीद अब्दुल हमीद

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : अल्पसंख्यांक विकास मंडळ संस्थापक व प्रदेशअध्यक्ष शोएब खाटीक यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा अध्यक्ष मुराद पटेल यांच्या उपस्थितीत २२ जुलै २०२५ रोजी शहीद अब्दुल हमीद यांचा पुतळा उभारण्या संदर्भात नगरपरिषद मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे

देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे परमवीर चक्र विजेते शहीद अब्दुल हमीद हे भारतीय सैन्याचे एक महान शूरवीर होते. त्यांच्या बलिदानाचे स्मरण प्रत्येक भारतीय नागरिकाने ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. नागद रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या कार्याचे स्मरण व नव्या पिढीस प्रेरणा मिळावी या उद्देशाने शहीद अब्दुल हमीद यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी आमची अल्पसंख्यांक विकास मंडळ या संस्थेच्या वतीने विनंती आहे.
आपल्या नगरपरिषदेमार्फत नागद रोड परिसरात योग्य ठिकाणाची निवड करून, आवश्यक परवानग्या घेऊन व निधीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवावा अशी आमची अपेक्षा आहे.हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयास व सार्वजनिक बांधकाम विभागास पाठवण्यात यावा ही विनंती.
आपल्याकडून या ऐतिहासिक व प्रेरणादायी उपक्रमास सहकार्य मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.यावेळी त्रीदल सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माजी सैनिक आबासाहेब गरुड, हवालदार शिवाजी पाटील जय जवान ग्रुप अध्यक्ष,BSF चे विद्यासागर पाटील, त्रीदल सेना उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष माजी सैनिक गोकुळ पाटील, अल्पसंख्यांक विकास मंडळ चाळीसगाव तालुका अध्यक्ष सय्यद सलीम, ग्रामीण तालुका अध्यक्ष जावीद मुल्ला, जिल्हा उपाध्यक्ष वसीम मास्टर शेख, तालुका कोषाध्यक्ष जावेद सय्यद ठेकेदार, शिवसेना अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष मुस्लिम समाजाची बुलंद तोफ वसीम चेअरमन शेख, शाहरुख शाह, मानव आव्हाड व इतर हिंदू मुस्लिम भाविक उपस्थित होते यावेळी नगरपरिषदचे मुख्याधिकारी सह आजी माजी सैनिक व अल्पसंख्यांक विकास मंडळ व शिवसेना उबाठा पदाधिकारी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here