क्रांती साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन संपन्न

क्रांती साखर

अहिल्यानगर (जिल्हा प्रतिनिधी दिपक वरखडे) : देविभोयेरे येथील क्रांती साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2025-26 साठीचा रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश नवले ,संचालक कैलास नवले व पांडुरंग नवले यांच्या हस्ते सोमवार (दि.२१) संपन्न झाला.

गळीत हंगामासाठी आवश्यक असणारी ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा, मशिनरी ओव्हरहॉलिंगसह दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अनेक अडथळ्यांवर मात करत कारखान्याची वाटचाल चालु आहे. येणारा गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने सर्व संचालक मंडळ व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास कारखान्याचे संचालक नरेंद्र दुर्वे यांनी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी आनंदा माने, मुख्य शेतकी अधिकारी उमाकांत जाधव,मुख्य अभियंता रमेश पुंडे,प्रॉडक्शन मॅनेजर कृष्णा लोखंडे ,इलेक्ट्रीक इंजिनिअर कैलास बर्शिले, कामगार नेते शिवाजीराव औटी, सर्व अधिकारी व कारखान्यांचे सर्व कर्मचारी रुंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here