डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना मंगळवेढा तालुका कार्यकारिणीचा सत्कार

डिजिटल मीडिया संपादक

सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : आज (दि.२२) अनिलदादा सावंत जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या मंगळवेढा तालुका कार्यकारिणीचा सत्कार समारंभ आज करण्यात आला.

यावेळेस अनिलदादा सावंत म्हणाले, पत्रकार बांधव ही समाजातील चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. डिजिटल माध्यमातून आपल्या भूमिका जनतेच्या प्रश्नाना वाचा फोडतात आणि नवीन कारणे कमी अधिक प्रभावपणे कार्य करेल अशी अपेक्षा यावेळेस व्यक्त केली. तसेच सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे परिचय करून घेत त्यांचा विशेष सत्कार फेटा शाल व गुलाब पुष्प एक डायरी देऊन भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य मंगळवेढा तालुका (अध्यक्ष) सुनील कसबे सर , भिमराव मोरे सर (उपाध्यक्ष), सचिन हेंबाडे (उपाध्यक्ष), राहुल मस्के (उपाध्यक्ष), रज्जाक मुजावर (कार्याध्यक्ष), येताळा खरबडे (सहकार्याध्यक्ष), बापूसाहेब मासाळ (सचिव), सुनील चेळेकर (सहसचिव), समाधान फुगारे (खजिनदार), संतोष पिसाळ (प्रसिद्धीप्रमुख) आदी नूतन पदाधिकाऱ्यांशी परिचय करून घेत त्यांचा विशेष सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here