सांगवी बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर

जळगाव (जिल्हा क्राईम रिपोर्टर अशोक तायडे) : आज दिनांक २२ जुलैला यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न झाले. आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून राबवले जाणारे शेतकऱ्यांसाठी व सर्व गावकऱ्यांसाठी ही योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत गाव पातळीवर पोहोचण्याचे काम करीत आहे

प्रामुख्याने सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, कृषीमित्र नारायणबापू पाटील, हिंगोणा येथील उपसरपंच भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सागरभाऊ कोळी, माजी पंचायत समिती सदस्य योगेश बंगाळे आदींच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्वजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सर्वप्रथम शेतकऱ्यांपर्यंत व इतर जनतेपर्यंत या योजनेचा हेतू व कार्य कसे चालू आहे हे यासंदर्भात नारायण बापू यांनी त्यांच्याकडे ज्या ग्रामस्थांच्या तक्रारी येत असतात जसे की शेती विषय महसूल विषय राशन कार्ड संदर्भामध्ये अशा अनेक योजनांच्या लाभ शेतकऱ्यांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्याची काम या योजनेद्वारे होत आहे यापुढे मोहनमाला नाझीरकर, तहसीलदार यांनी ह्या कार्यक्रमाचे विशेष महत्व आलेल्या ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना समजावून सांगितले त्यात शेतीविषयक पिक विमा राशन कार्ड आधार कार्ड फार्मर आयडी जिवंत सातबारा वारस नोंदी करणे मयतांचे नाव कमी करणे अशा अनेक विविध प्रकारच्या कृषी योजना महसूल योजना ग्रामस्थांना समजावून सांगितल्या व त्याचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले.
तहसील कार्यालय मार्फत पुरवल्या जाणाऱ्या योजनांचे पत्र वाटप करण्यात आले त्यात संजय गांधी योजना उत्पन्न दाखले जातीची दाखले राशन कार्ड पीएम किसान योजना आरोग्य योजना यासंदर्भातील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप केले कार्यक्रमाला सांगवी येथील सरपंच उपसरपंच सदस्य आशा वर्कर अंगणवाडी सेविका सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते लाभार्थी सचिन भाऊ चौधरी तसेच शासकीय कर्मचारी पंचायत समिती पंचायत समितीचे अधिकारी किशोर सपकाळे आरोग्य कर्मचारी भालोत प्राथमिक आरोग्य सांगवी तलाठी डोंगर कठोरा कोतवाल विजय आढाळे सांगवी कोतवाल सागर तायडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कठोरा तलाठी गजानन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अट्रावल गावचे तलाठी कु हेमा सांगोले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here