मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्याकडून अनोखा उपक्रम

देवेंद्र फडणवीस

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : भाजपा शिर्डी शहराचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या वतीने आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे निमित्त शिर्डी शहर नियमित स्वछ राहील यासाठी अहोरात्र काम करणार्‍या सफाई कर्मचारी महिलांना पैठणी व पुरूषांना ड्रेस आणि मिठाईचे वाटप करून सन्मान करण्यात आला व लाडक्या बहिणींनी केक कापुन घोषणा देत वाढदिवस साजरा केला.

त्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिलीपराव, सुनील, गणेश, दिगंबर या गोंदकर परिवाराच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. सर्व कार्यकर्ते व सफाई कर्मचाऱ्यांनी देवाभाऊ यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रत्येकाने श्री साईबाबांचे चरणी द्वारकामाई मध्ये नारळ अर्पण केले. त्यांच्या हातून महाराष्ट्राचा अधिकाधिक विकास व्हावा अशी प्रार्थना करून बाबांचे महासमाधीवर वस्त्र अर्पण करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपा माजी शहराध्यक्ष सचिन शिंदे, माजी नगरसेवक गजानन शेर्वेकर, गणेश कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन प्रतापराव जगताप, शिर्डी नप चे माजी गटनेते अशोक गोंदकर, माजी नगराध्यक्षा अलकाताई शेजवळ, देवराम भाऊ सजन, भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष सचिन तांबे, जनेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कोते, भाजपा युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष चेतन कोते, गणेश जाधव, माजी नगरसेवक किरण बर्डे, अड.विक्रांत वाकचौरे, जयंतीभाई पटेल, किरण बोरुडे, वसंत गोंदकर, सोमराज कावळे, पंडित गुडे, शाम गायके, आकाश त्रिपाठी, प्रतीक शेळके, प्रकाश गोंदकर, गणेश सुपेकर, सुभाष यादगुडे, धनसिंग पाटील, तान्हाजी गोंदकर, रमेश शेळके, शब्बीर भाई सय्यद, सुधीर शिंदे, बाळासाहेब ओस्तवाल मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here