भडगाव (तालुका क्राईम रिपोर्टर अमीन पिंजारी) : तालुक्यातील कजगाव येथून जवळच असलेले भोरटेक गावाजवळ सायंकाळी शाळेतून घरी परतत असताना एका शाळकरी मुलाला एसटी महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिली. या धडकेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी चाळीसगाव येथे रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार कुणाल किशोर कोळी (वय १४) रोज प्रमाणे दिनांक २२ जुलै रोजी संध्याकाळी तांदूळवाडी येथून शाळेतून घरी परत येत असताना ही घटना घडली, गाडी क्रमांक (MH 14 MH 3791) ही एसटी महामंडळाची बस ने कुणाल ला धडक दिली या अपघातात कुणाल गंभीर जखमी झाला, घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमी झालेल्या कुणाला पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथे पाठवण्यात आले.
नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली असता भडगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व संबंधित एसटी बस पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली असुन पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे, मात्र या अपघातामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट असून रस्त्यावरील वाहतुकीबाबत योग्य नियंत्रण ठेवावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.







