मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी रक्तदान व वृक्ष लागवडीचा संकल्प

देवेंद्र फडणवीस

सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभा मतदारसंघांमध्ये भव्य महा रक्तदान शिबिर आणि वृक्षरोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आले.

पर्यावरण रक्षण आणि सामाजिक भान जपत या दोन्ही उपक्रमानांना मतदारसंघातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंढरपूर येथे आमदार समाधान आवताडे यांनी श्री भगवंत विठ्ठल रुक्मिणी मातेची कार्तिक करून तुळशी पूजन केले. त्याचबरोबर माचनूर येथील श्री सिद्धेश्वर हुलजंती येथील श्री महालिंगराया हून्नूर येथील श्री बिरोबा लक्ष्मी दहिवडी येथील लक्ष्मी देवी मंगळवेढा शहर येथे दामाजीपंत व संत चोखामेळा स्थानिक देव अभिषेक करून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. समाजातील गरजूंना नवजीवन देणाऱ्या या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील बोराळे हुलजंती शिरनांदगी लक्ष्मी दहिवडी येथे तर पंढरपूर तालुक्यात गादेगाव लक्ष्मी टाकळी तावशी व अनवली या ठिकाणी ७८४ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाज प्रति आपली जबाबदारी पार पाडली आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात ५५,५५५ वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. या वृक्षरोपण व संवर्धन संकल्पना शुभारंभ मंगळवेढा मंगळवेढा शहरातील इंग्लिश स्कूल येथे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुजित कदम यांच्या नियोजनातून आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते छोटेसे रोपटे लावत करण्यात आला यावेळी उपस्थित राहून ग्रामस्थांना वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व आमदार समाधान अवताडे यांनी यावेळी समजावून सांगितले.
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी आणि सकल राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी व विधायक प्रगतीसाठी केलेली कृतिशील बांधिलकी आणि त्याचा लोककल्याणाचा दृष्टिकोन याला समर्पित भावनेतून ही दोन्ही शिबिरे आयोजित करण्यात आले होती असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. याप्रसंगी तहसीलदार मदन जाधव तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ जाधव सामाजिक वनीकरण च्या शीतल चाटे तसेच विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व मंडल अध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here