बी.जे. मार्केट परिसरात प्रौढाला मारहाण प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल

marhan
file photo

जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) : कामावरून घरी जात असलेल्या प्रौढाच्या डोक्यात दुचाकीवरील एकाने बीअरची बाटली मारून गंभीर दुखापत केली. याबाबत त्याने जाब विचारला असता त्यांच्या छातीत दगडही मारण्याची घटना दि. २० जुलै रोजी रात्री बी.जे. मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीतील राहिवासी संजय मालचे (वय ५०) हे एका हॉटेलमध्ये कामाला आहे. काम आटोपल्यानंतर रात्री घरी जाण्यासाठी पायी निघाले असतांना, बी. जे. मार्केटजवळ एका दुचाकीवर आलेल्या तीन जणांपैकी मागे बसलेल्याने मालचे यांच्या डोक्यात बीअरची बाटली मारली. यामुळे डोक्याला जखम होवून मोठा रक्तस्त्राव होऊ लागला. त्यांनी मारण्याविषयी जाब विचारला असता त्यांच्या छातीत पुन्हा दगड मारण्यात आला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत तिघेही जण पळून गेले.
याप्रकरणी संजय मालचे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संतोष चव्हाण करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here