इराणच्या झाहेदान शहरात न्यायालयावर दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला

तेहरान (वृत्तसंस्था) – येथील झाहेदान प्रांतात दहशतवादी हल्ला झाला आहे. शनिवारी (२६ जुसै) सकाळी इराणच्या झाहेदान प्रांतात न्यायिक मुख्यालयावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात ५ जणांचा मृत्यू, तर १३ जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या या घटनेने इराणमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.

इराणच्या न्यायपालिका माहिती केंद्राने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरु केला. यामुळे इराणच्या झाहेदान शहरात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात गेल्या काही काळाता दहशतवादी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जैश-अल-अदल नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबादारी स्वीकारली आहे. या संघटनेने आतापर्यंत इराणवर अनेकवेळा दहशतवादी कारवाया केला आहे. इराणविरोधी अतेरिक गट म्हणून या संघटनेला ओळखले जाते. झाहेदान शहरात सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात अशांतता वाढत आहेत. यामुळे इराणच्या सरकारमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here