पुणे् (प्रतिनिधी राहुल सोनाळे) : लष्कर तसेच कोंढवा भागात बंद घरे फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. लष्कर पोलिसांनी ही कारवाई केली असून, दोन गुन्हे उघडकीस आणत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन गुन्हेगार हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. आर्यन अजय माने उर्फ मॉन्टी (वय २१, रा. फुरसुंगी) व विशाल मारूती आचार्य (वय २५, रा. रामटेकडी) व ओमकार सुरेश गोसावी (वय २२, रा. फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, उपनिरीक्षक राहुल घाडगे, रमेश चौधर व त्यांच्या पथकाने केली आहे.







