ठाणे (सहसंपादक लक्ष्मीकुमार वन्नम) : गटारी अमावस्यानिमित्त टिटवाळ्याजवळील रायते येथील आदित्य फार्महाऊसवर झालेल्या पार्टीत गाणं लावण्याच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. उल्हासनगरातील शिवसेना (शिंदे गट) युवासेनेचा पदाधिकारी विकी भुल्लर आणि त्याच्या साथीदारांनी करण जाधव या युवकावर हातोडा, हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली.
या घटनेत करण जाधव गंभीर जखमी असून त्याच्यावर कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात विकी भुल्लर, हैप्पी भुल्लर, सनी भुल्लर, मुकेश यादव, सचिन शेवाळे, मणि अण्णा, रमु आणि डॅनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असला तरी, घटनेनंतर 48 तास उलटून गेले तरीही एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.जखमी करण जाधवने पोलिसांवर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. सध्या पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.







