बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण करणाऱ्या ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

crime
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : खासगी ट्युशनमध्ये १० वर्षांच्या मुलाला बेल्ट अन् वह्यांनी मारहाण केल्या प्रकरणी शिक्षिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कोंढव्यातून हा प्रकार समोर आला आहे. बुधवारी सायंकाळी कोंढव्यात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने घरात ट्युशनवेळी १० वर्षाच्या मुलाला मारहाण केली. शिक्षिकेन मुलाला बेल्ट आणि वह्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये चिमुकल्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याचा दावा केला आहे. १० वर्षाच्या मुलाच्या ३३ वर्षीय आईने शुक्रवारी याबाबतची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा आणि शिक्षिका एकाच एरियात राहतात.

कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. पाटणकर यांनी याबाबत सांगितले की, आरोपी महिला कोंढव्यातील एका सोसायटीतील तिच्या फ्लॅटमध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ट्युशन घेते. त्या महिलेविरोधात तक्रार करणारी महिला आणि मुलगा जवळच राहतात. गेल्या काही दिवसांपासून मुलगा ट्युशनसाठी जात नव्हता. ही शिक्षिका सर्व विषय शिकवते.
पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की, १० वर्षांच्या मुलाने गृहपाठ केला नव्हता. त्याने शिक्षिकेला वह्या दाखवल्या नाहीत. अभ्यास केला नाही अन् वह्याही दाखवल्या नाहीत, म्हणून शिक्षिका संतापली होती. त्या शिक्षिकेने मुलाला शिविगाळ केली अन् बेल्ट-वह्यांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे मुलाला दुखापत झाली असून त्याला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, असे तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here