पुण्यात रेव्ह पार्टीवर धाड; राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा पती ताब्यात

रेव्ह पार्टी

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : खराडी भागातील उच्चभ्रू सोसायटीत सुरु असणा रेव्ह पार्टीवर मारलेल्या पोलिसांच्या छापेमारीत रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली.

हाऊस पार्टीच्या नावाखाली या रेव्ह पार्टीमध्ये अंमली पदार्थ, हुक्का, दारूचे सेवन सुरु होते. यात सोसायटीतील एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरसह 3 महिला आणि दोन पुरुषांचाही सहभाग होता. दरम्यान या प्रकरणावर बोलतांना “कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल,” अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील खराडी परिसरातील नामांकित हॉटेल स्टेबर्ड अझुर सुट या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सातजणांना अटक करण्यात आली. खेवलकर यांचा व्यवसाय जमीन खरेदी-विक्रीचा असून ते प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय नसले तरी त्यांचा राजकीय कुटुंबाशी संबंध आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील स्टेबर्ड अझुर सुट हॉटेलमध्ये प्रांजल खेवलकर यांच्या नावावर दोन रूम बुक करण्यात आल्या होत्या. एका रूमचे २५ ते २८ जुलै तर दुसऱ्या रूमचे २६ ते २७ जुलैपर्यंतचे बुकिंग करण्यात आले होते. प्रत्येक रूमसाठी १० हजार ३५७ रुपये भाडे अदा करण्यात आले होते, अशा पावत्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणी एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक राज्याचे जलसंपदा तथा कुंममेळामंत्री गिरीश महाजन यांनी, रेव्ह पार्टीत खडसे यांच्या जावईचा केवळ समावेश नव्हता तर, ते आयोजकच असल्याचा आरोप करत खडसे यांना कोंडीत पकडले आहे. दरम्यान, आज रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी “कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल,” असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here