पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : येथील बाणेर भागात रिक्षा चालकाने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी घेऊन जातो, अशी बतावणी करून रिक्षाचालकाने रिक्षात बसवले. त्यानंतर खडकीतील रेंजहिल्स परिसरात रेल्वे रूळाजवळ त्यांना जखमी अवस्थेत सोडून रिक्षाचालक पसार झाला.
वेळेत उपचार न मिळाल्याने ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षाचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.







