पतीसाठी रोहिणी खडसे मैदानात; वकिलाचा काळा कोट घालून पुणे कोर्टात उपस्थिती

रोहिणी खडसे

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : तीन दिवसांपूर्वी रोहिणी खडसे यांचे पती कथित रेव्ह पार्टी करतांना पकडले गेले असून आधी त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. यानंतर आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत.

आज पती प्रांजल खेवलकर यांच्यासाठी पुणे कोर्टात अंगावर वकिली कोट चढवून हजेरी लावली. काल त्यांनी पोलिसांची भेट घेत प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, याबाबत माहिती घेतली. आता आपल्या पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे ह्यांनी अंगावर वकिलीचा कोट चढवला. त्या सुनावणीदरम्यान, पुणे न्यायालयात वकिलीचा कोट घालून हजर होत्या.
या माध्यमातून त्यांनी प्रतिकात्मक पध्दतीने सरकारचा निषेध तर केलाच पण पतीसाठी स्वत: मैदानात उतरत विरोधकांना उत्तर दिले आहे. आज सकाळीच आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या जावयाला राजकीय सूडबुध्दीने अडकवण्यात आल्याचा आरोप केला होता.
यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना सुनावणी आणि घडलेल्या प्रकरणाविषयी प्रश्न केले. परंतु हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे यावर काही बोलू शकत नाही. परंतु योग्यवेळी मी माझी भूमिक मांडेन असं रोहिणी खडसे न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here