ठाणे पोलिसांनी दोघांकडून २ किलो १८४ ग्रॅम वजनाचा एम.डी. अंमली पदार्थ केला जप्त

ठाणे पोलिसांनी

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : पोलीस आयुक्त, ठाणे यांनी अंमली पदार्थ विक्री संदर्भात विशेष मोहीम राबवुन कडक कारवाई करण्या संदर्भात आदेश दिले होते. त्याअनुषंगाने अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे डॉ. पंजाबराव उगले, व पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे अमरसिंह जाधव यांनी सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सहा. पोलीस आयुक्त, शोध १, गुन्हे शाखा, ठाणे शेखर बागडे व सहा. पोलीस आयुक्त, प्रशासन, ठाणे विनय घोरपडे यांच्या सुचनेप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के व गुन्हे शाखा घटक १, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी विशेष मोहिम राबविली होती.

सदर विशेष मोहिमे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर व गुन्हे शाखा घटक १, ठाणे यांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ०२ आरोपी अटक करून त्यांच्याकडुन एकुण २ किलो १८४ ग्रॅम वजनाचा ३,९७,३९,७००/- रू. किमतीचा एम.डी. हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २७/०७/२०२५ रोजी पोहवा/५७२९ हरिश तावडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मा. वरिष्ठांचे परवानगीने सापळा कारवाई केली असता दिनांक २७/०७/२०२५ रोजी १७.४७ वा. वेलकेअर केमिस्ट समोर शिळ फाटयाकडुन दिवा गांवाकडे जाणारे रोडवर, शिळफाटा, ता जि. ठाणे याठिकाणी इरफान अमानुल्लाह शेख, वय ३६ वर्षे, धंदा-झोमॅटो फुड डिलेव्हरी, रा.ठि. गॅलेक्सी व्हिला, रूम नं. २०१, सेक्टर १९, प्लॉट नं. ४७, उलवे, ता पनवेल, जि रायगड हा आपले ताब्यात १ किलो ५२२ ग्रॅम वजनाचा ‘एमडी Mephedron’ हा अंमली पदार्थ विक्रीकरीता बाळगताना मिळुन आलेला आहे. सदरबाबत शिळ डायघर पोलीस स्टेशन, ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक ७८३/२०२८ एन.डी.पी.एस कायदा कलम १९८५ चे कलम कलम ८ (क), २२ (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक आरोपीची दिनांक ३१/०७/२०२५ रोजीपावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे. नमूद गुन्ह्याचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या कडुन करण्यात येत आहे.सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल मस्के, सपोनि / निलेश मोरे, जगदशि गावित, सोमनाथ कर्णवर – पाटील, पोउपनि / राजेंद्र निकम, नितीन भोसले, दिपक डुम्मलवाड, पोहवा / हरीष तावडे, अभिजीत मोरे, अमोल देसाई, हुसेन तडवी, अजय सपकाळ, अमित सपकाळ, नंदकिशोर सोनगिरे, गिरीष पाटील, पोशि / प्रमोद जमदाडे, आबाजी चव्हाण, चापोना / अनुप राक्षे, मपोहवा / शिल्पा कसबे, मपोशि / कोमल लादे यांनी केली आहे.
दिनांक २४/०७/२०२५ रोजी गोपनीय सुत्रांनुसार प्राप्त माहितीच्या आधारे भिवंडी कडुन मुंब्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर, बंद असलेल्या खारीगांव टोलनाक्या जवळ, कळवा, ठाणे येथे सापळा कारवाई केली असता इसम नामे शाहरूख सत्तार मेवासी उर्फ रिजवान, वय २८ वर्षे, धंदा-मिस्त्रीकाम, राह. ठी. गांव-एलची, पोस्ट/तहसिल-दलौदा, जिल्हा-मंदसौर, राज्य मध्य प्रदेश याची व त्याच्या ताब्यातील हयुंडाई क्रेटा कार क्र. MP-09-AF-1777 या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये एकुण रू.९२ लाख ६८ हजार रूपये किंमतीचा ६६२ ग्रॅम वजनाचा एमडी (MD) हा व्यापारी मात्रा असलेला अंमली पदार्थ मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याच्या विरुद्ध कळवा पोलीस स्टेशन, ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ६५२/२०२५ एन.डी.पी.एस कायदा कलम १९८५ चे कलम कलम ८ (क), २२ (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. नमुद आरोपीत यास मा. न्यायालयाने दि. ३०/०७/२०२५ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. नमूद गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे यांच्या कडुन करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उप निरीक्षक प्रकाश शिरसाठ, म. पोलीस उप निरीक्षक निलम जाधव, सहा. पोलीस उप निरीक्षक दयानंद नाईक, पोहवा/नागराज सोनकडे, प्रशांत निकुंभ, नंदकुमार पाटील, धनंजय आहेर, बाळु मुकणे, पोलीस शिपाई/मयुर लोखंडे, सर्व नेम. गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे यांच्या पथकाने केली आहे.या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थाचे उत्पादन, विकी, वाहतुक, साठवणुक यामध्ये कोण कोण सहभागी आहे ? याबाबतचा तपास सुरू आहे.
अंमली पदार्थ विक्री, साठवणुक, वाहतुक, सेवन करणे हा अपराध असुन यामध्ये सहभागी असलेले इसमांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध असल्यास अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांचे दुरध्वनी क्रमांक ०२२/२५३९६६८७ यावर देण्यात द्यावी. माहिती देणारे इसमांची नांवे गोपनीय ठेवली जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here