सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन सभा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा परशुराम विद्यालय व जुनिअर कॉलेज वडूज या ठिकाणी संपन्न झाली. खटाव तालुक्यातील सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक या सभेसाठी उपस्थित होते
या शैक्षणिक वर्षांमध्ये होणाऱ्या सर्व क्रीडा स्पर्धांचे नियोजन करण्यात आले. या बैठकीस महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष मनोहर यादव, विभागीय अध्यक्ष श्री आर वाय जाधव, बालभारती पाठ्य पुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य श्री आर एन पवार सर, श्री जाधव सर, सातारा जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी श्री नितीन तारळकर, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सुमित पाटील सर, खटाव तालुक्याच्या नूतन क्रीडा अधिकारी सौ गाढवे मॅडम, श्री कयूम शेख, श्रीमंत कोकरे, एस पी देशमुख, एस एस पवार, प्राध्यापक दिलीप बरकडे श्री शिंगाडे सर आणि खटाव तालुक्यातील सर्व शाळांचे क्रीडाशिक्षक या सभेसाठी उपस्थित होते
सुरुवातीला हुतात्मा परशुराम विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ बी एस माने मॅडम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार केला. चालू शैक्षणिक वर्षात घेतल्या जाणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धाचे नियोजन करताना खेळाडूंची ऑनलाईन माहिती व इतर बाबींची माहिती देण्यात आली. यावेळी मनोहर यादव, आर वाय जाधव, आर एन पवार, तालुका क्रिडा अधिकारी सौ गाडवे मॅडम, जिल्हा क्रिडा अधिकारी नितीन तारळकर यांची मनोगते झाली.
खटाव तालुका क्रिडा संकुल चा प्रश्न तातडीने मार्गी लावून तालुकास्तरीय स्पर्धा या क्रिडा संकुल ला होतील असा प्रयत्न करूया असेही सांगण्यात आले. थांग ता क्रिडा संघटना अध्यक्ष जयवंत गोडसे यांनी जिल्हा क्रिडा अधिकारी यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक खटाव तालुका शा शी संघटना अध्यक्ष राजेंद्रकुमार जगदाळे यांनी केले. उपस्थितांचे आभार क्रिडा संघटना सचिव एस एस पवार यांनी मानले.







