वासिद (सहसंपादक नामदेव पाटील) : दिनांक २९/०७/२०२५ रोजी १८.०० वा ते दिनांक ३०/०७/२०२५ रोजी १८.०० वा चे दरम्यान फिर्यादी श्री.सागर सखाराम उबाळे वय ३७ वर्षे रा. महंत मलाया अपार्टमेंन्ट रुम नं. २०३, राईस मिल समोर, वाशिंद पुर्व जि.ठाणे हे आपले पत्नीसह घर बंद करुन बाहेर गेले असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकुण १,४६,५००/- रुपये किंमतीचा माल घरफोडी चोरी करुन नेला याबाबत दिलेल्या तक्रारी वरुन वाशिंद पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक १२९/२०२५ बि.एन.एस ३०५, ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे दिनांक ३०/०७/२०२५ रोजी २१.४६ वा गुन्हा दाखल करण्यात आला
गुन्हयांचे गाभिर्य लक्षात घेता मा. श्री. डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण तसेच श्री. अनमोल मित्तल, अपर पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण यांनी समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणे कामी स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांना आदेश देवुन मार्गदर्शन केले त्याप्रमाणे श्री. सुरेश मनोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांनी ठाणे ग्रामीण गुन्हा उघडकीस आणणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन त्यांना मार्गदर्शनपर सुचना दिल्या.
सदर पथकाकडुन गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रीक तपास करुन कोणताही धागा दोरा नसताना अथक परीश्रम घेवुन आपले गुप्त बातमीदारांचे मार्फतीने सदरचा गुन्हा करणारा आरोपीताचा २४ तासाचे आत शोध लावुन इसम नामे गणेश सखाराम डगळे वय २२ वर्षे रा. संकल्प अपार्टमेंन्ट, पहीला मजला, भोंडवे नगर वाशिंद पुर्व ठाणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्य पुर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्हयात चोरलेला १,३८,०००/- रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागीने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यास पुढील कार्यवाही कामी वाशिंद पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरचा गुन्हा मा. श्री. डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, तसेच मा. श्री. अनमोल मित्तल, अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण याचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुरेश मनोरे, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांचे सचुनेप्रमाणे पो.उप.निरीक्षक श्री. महेश कदम, पो.उप.निरीक्षक श्री. भाऊसाहेब गायकवाड, पो.उप.निरीक्षक श्री. सुरळकर पो. हवा / संतोष सुर्वे, पो. हवा / गोविंद कोळी, पो. शि/ स्वप्नील बोडके व पो. शि/ सुरेश धिंदळे यांचे पथकाने उघडकीस आणलेला असुन गुन्हयाचा पुढील तपास वाशिंद पोलीस ठाणे करीत आहे.







