पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : गणेशोत्सवानिमित्ताने ढोल-ताशा पथकांकडून सराव सुरू आहेत. ठिकठिकाणी पथके रात्री सराव करतात. त्यासाठी या पथकांकडून पत्र्यांचे शेड मारून त्याचठिकाणी ढोल-ताशा ठेवले जातात. बाणेर भागात देखील पाषाण-सुस रोड येथील नवचैतन्य हास्यक्लब येथे नादलव्य वाद्य पथकाकडून सराव सुरू आहे.
सरावानंतर ढोल-ताशा ठेवून गेले असता अज्ञात इसमाने येथून ३० ताशा चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. पथकाने या भागातील ४४ सीसीटीव्ही तपासले. त्यातून चोरटा वसिम हसिबूर शेख (वय २२, रा. सुसगांव) याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १२ ताशा जप्त केले असून उर्वरित ताशाबाबत चौकशी सुरू केली आहे.







