बाणेर पोलिसांनी मोबाईल चोर आणि चैन स्नॅचरच्या आवळल्या मुसक्या

अटक
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : शहरात चैन स्नॅचिंग तसेच मोबाईल हिसकावण्याच्या घडत असतानाच बाणेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मोबाईल चोर आणि चैन स्नॅचरच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले चैन व मोबाईल जप्त केला आहे.

पहिल्या चैन चोरीच्या घटनेत शफिक मोदीन शेख (वय २६, रा. तलवडे) तसेच मोबाईल चोरीप्रकरणात फिरोज अब्दुल कुददुसशहा (वय २१, रा. गणेशनगर, वाकड) या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग व त्यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरात चैन स्नॅचिंग तसेच मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्यात बालेवाडीत एका पादचारी महिलेच्या गळ्यातील दोन चोरट्यांनी दुचाकीवरून सोनसाखळी हिसकावली होती. तसेच काही दिवसांनी बाणेर परिसरातून एका पादचारी तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला होता. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी तपासाबाबत सूचना केल्या होत्या. यादरम्यान, पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तपासातून सोनसाखळी चोरीप्रकरणात शफिक शेख याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानूसार पथकाने त्याला पकडले. नंतर मोबाईल चोर फिरोज यालाही तांत्रिक तपासातून बेड्या ठोकल्या. या दोघांनी आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत का, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here