नितीन गडकरींच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी

नितीन गडकरीं

नागपूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : वर्धा रोडवरील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थान एनरिको हाइट्सला रविवारी सकाळी ८:४६ वाजता बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर पोलिस नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकाच्या आपत्कालीन क्रमांकावर अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून ही धमकी देण्यात आली.

नितीन गडकरी यांच्या घरावर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसही अॅक्शन मोडवर आले आहे. फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने यासंदर्भात तापस सुरू केला आहे. धमकी आल्यानंतर प्रताप नगर पोलिस ठाण्याला याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचून झडती घेतली. मात्र, झडतीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
झोन-१ चे डीसीपी ऋषिकेश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अज्ञात फोन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. तसेच, पोलीसांकडून फोन करणाऱ्याचा अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. मंत्री नितीन गडकरी सध्या नागपुरात असून धमकीनंतर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. तसेच, या घटनेचा तपास वेगाने केला जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here