पुण्यात दुचाकीला कट मारल्याने रागाच्या भरात हवेत गोळीबार

gun-fire
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : अवघ्या २४ तासात पु्ण्यात दोन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. पुण्याजवळील कोल्हेवाडीत हवेत गोळीबार करण्यात आला. तर दुस-या घटनेत बंदुकीतून चुकून गोळी सुटल्यानं एक तरुण जखमी झाला होता.

दुचाकीला कट मारल्याच्या रागातून एकाने हवेत गोळीबार केलाय. दुचाकीला कट मारल्याच्या रागातून एकाने देशी बनावटीच्या पिस्तूलातून हवेत गोळीबार केला. गोळीबारीची घटना दुपारी कोल्हेवाडी परिसरात घडली. नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणाऱ्या एकाला ताब्यात घेतलंय. तर पसार झालेल्या आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
याआधी झोन ३ च्या हद्दीत रविवारी रात्रीच उत्तम नगर परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. बंदुकीतून चुकून गोळी सुटल्यानं एक तरुण जखमी झाला होता. मित्रांना पिस्तूल दाखवण्याचा नादात मित्राकडूनच गोळी सुटली. गोळीबारात मित्राच्या पायात गोळी लागली होती. पुण्यातील उत्तमनगर भागात रविवारी रात्री ही घटना घडली होती. पिस्तूल लोड अनलोड करताना तरुणाकडून अचानक गोळी सुटली. ती गोळी समोर उभा असलेल्या मित्राच्या पायाला लागली. पुण्यातील उत्तमनगर परिसरात ५ तरुण हे एका “पबजी” मोबाईल गेम खेळत होते.
दरम्यान यातील एकाने त्याच्याकडे असलेलं पिस्तूल बाहेर काढलं आणि तो इतर मित्रांना दाखवायला लागला. याचदरम्यान अनर्थ घडला. पिस्तुलातून गोळी अचानकपणे सुटली. उत्तमनगर पोलिसांनी या तरुणांपैकी एकाकडे असलेलं पिस्तूल जप्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here