नागपूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : येथे एमबीबीएसच्या अंतिम वर्गात शिकणाऱ्या संकेत दाभाडे या विद्यार्थ्याने घरातील बाथरूमच्या दरवाज्याला शाल बांधून गळफास लावून आयुष्य संपवले. दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार समोर आला. या आत्महत्येने एकच खळबळ उडाली.
संकेत एम्स हॉस्पिटलमध्ये शेवटच्या वर्गात शिकत होता. घटनेच्या दिवशी तो शाल घेऊन बाथरूममध्ये गेला. बाथरूमच्या दरवाज्याला शाल बांधून त्याने गळफास घेत आत्महत्या केली. सोनगाव पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून त्याच्या खोलीचा दरवाजा बंद होता. संकेत घराबाहेर आलाच नाही, असे शेजाऱ्यांनी सांगितले. खोलीमध्ये कोणतीही हालचाल नव्हती. कोणताही आवाज येत नव्हता.
दरम्यान, संकेत दिसला नाही म्हणून इतर विद्यार्थ्यांना संशय आला. त्यांनी या संदर्भातील माहिती वार्डनला दिली. वार्डनने संकेतच्या खोलीचा दरवाजा तोडला. तसेच बाथरूमचाही दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.संकेत हा तरूण एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. त्याने अचानक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले यावरून एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे. याच्या अधिक तपासानंतर सत्य समोर येणार आहे.







