ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) : बहिणीच्या नवऱ्यानेच आपल्या अल्पवयीन मेव्हणीवर वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती केल्याची घटना मुंबईत घडली आहे. पीडित मुलीच्या बहिणीने आपल्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका ४० वर्षीय तरुणाला अटक केली. तर गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूतीत मदत केल्या प्रकरणी पीडित मुलीच्या बहिणीला म्हणजेच आरोपीचा बायकोला देखील पोलिसांनी अटक केली. मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा भयंकर प्रकरण उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी तिची मोठी बहिणी आणि तिच्या नवऱ्यासोबत एकाच घरात राहत होती. या अल्पवयीन मुलीने आरोप केला आहे की, तिच्या मेहुण्याने मार्च २०२४ ते जुलै २०२५ दरम्यान तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला होता. जेव्हा तिने तिच्या मोठ्या बहिणीला गरोदरपणाबद्दल सांगितले तेव्हा तिने तिला धमकावले आणि कुणाकडेच मदत मागू दिली नाही.
नवऱ्याचा गुन्हा लपवण्यासाठी पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीने अल्पवयीन मुलीला डॉक्टरकडे जाऊ दिले नाही. तसंच कोणत्याही वैद्यकीय उपचारांसाठी बाहेर जाऊ दिले नाही. तिने घरीच पीडित मुलीची प्रसूती केली. पण जेव्हा मुलीची प्रकृती बिघडली तेव्हा तिला भाभा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी घटनेची माहिती पोलिसांनी दिली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि धमक्या दिल्याबद्दल बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा म्हणजेच पोक्सो अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुख्य आरोपीला अटक केली. पोलिसांनी पीडितेच्या मोठ्या बहिणीवर गुन्ह्याची माहिती लपविण्याचा, पुरावे गायब करण्यास कारणीभूत ठरण्याचा आणि अल्पवयीन मुलीला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिलाही अटक करण्यात आली.







